शासकीय रुग्णवाहिका चालकांचे मानधन थकले

गोंदिया ◼️जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत रुग्णवाहिका चालकांनी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची भेट घेऊन मागील एक वर्षापासून थांबलेला पगार शासनाकडून लवकरात लवकर पगार मिळावा अशी मागणी केली. तसेच मागणीचे निवेदन सादर केले. या संदर्भात माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शिष्टमंडळासमोर आयुक्त एनआरएचएम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तात्काळ कार्यवाहीसाठी आयुक्तांना निवेदन पाठवले. त्यामुळे या रुग्णवाहिका चालकांचे थकलेले पगार लवकर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवेदन देणार्‍यांमध्ये शासकीय रुग्णवाहिका चालक फारुख पठाण, अल्ताफ परवेझ, अकील शेख, जाहिद सय्यद, अतिक कुरेशी, नरेंद्र हुकरे, राजेश भोयर, विनोद भदाडे, नामदेव पडोळे, शेखर शरणागत, आनंदराव लांजेवार, मनोज उपाध्याय, देवळेकर आदींचा समावेश होता. यावेळी रविकांत बोपचे, अशोक गायकवाड, नरेश उके, नंदकिशोर आगासे, किशोर लंजे, देवराज मुनेश्वर, संजय पटले आदी उपस्थित होते.

Share