गोंदियात शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध

गोंदिया ◼️महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या तालुका शाखेतर्फे आज, 22 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी पंस कार्यालयावर मोर्चा काढून शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. नेहरु चौकातून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुकदेव शहारे, तालुका सचिव विनोद शहारे, कार्याध्यक्ष महेंद्र कटरे, उपाध्यक्ष जगदीश ठाकरे, संघटन सचिव देवेन्द्र मेश्राम यांनी केले. दरम्यान विस्तार अधिकारी डी.आर. लंजे यांना निषेध व मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रसंगी लंजे यांनी निवेदन स्विकारूण तक्रार निवारण समितीच्या सभेत प्राप्त तक्र्रारींचे निराकरण 28 फेब्रुवारीपर्यंत होण्याची शक्यता दर्शविली.

Share