छत्रपतींच्या कृति अंगीकृत करा – IPS निखिल पिंगळे
गोंदिया ◼️छत्रपतींचा इतिहास न विसरणारा आहे. शिवचरित्राचे वाचन करा. ती आजच्या जिवनात काळाची गरज आहे. छत्रपतींचे नुसते फोटो लावुन व जयंती साजरी करून चालणार नाही तर त्यांची कृति प्रत्यक्षात जिवनामध्ये आणून आदर्श अंगीकृत करा, असे प्रतिवादन पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी केले. स्थानिक मनोहर चौक येथे श्री शिव छत्रपती मराठा समाजव्दारे 19 फेब्रुवारी रोजी आयोजित शिव जयंती समारोहात पिंगळे बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण व निखिल पिंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे होते. पाहुणे म्हणून नगर परिषदचे मुख्याधिकारी करण चव्हाण, कार्यकारी अभियंता अनंत जगताप, वरिष्ठ मार्गदर्शक वसंतराव बढे, बार अशोसिएशनचे अध्यक्ष अँड. राजा बढे, शहर पोलिस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, उद्योगपति दामोदर अग्रवाल, व्दारका सावंत, माधुरी नासरे, भावना कदम, माया सणस, राजु तुपकर आदींची उपस्थिती होती. प्रसंगी छत्रपती शिवाजींचा पुतळा दान करणारे दिपक, नारायण, शिला या सावंत कुटुंबीयांचा तसेच नगर परिषद अभियंता अनिल दाते, आर्किटेक्ट विवेक भालेराव, अंधत्व निवारण करणारे प्रो. शशीकांत चवरे, शुटींग गोल्ड मेडलीस्ट आदित्य जगताप, दिव्यांग धर्म काळे यांचा शाल व श्रीफल देवुन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी शिवाजी महाराजांचा जिवन चरित्रावर प्रकाश टाकून मनोहर चौक येथे मराठा समाजव्दारे प्रस्तावित शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा काही त्रुटींसाठी थांबली असुन त्रुटींची पुर्तता लवकरच केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवाजी महाराज प्रतिमा देखरेख समितीची स्थापना करण्यात आली यात अध्यक्षपदी राजेन्द्र जगताप त्यांची नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी शहरातून कुणबी समाजाच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समापन मनोहर चौक येथे झाला. रैलीचे नेतृत्व अमर व-हाडे, गजेन्द्र फुंडे यांनी केले. डॉ कार्यक्रमाचे संचालन मराठा समाजाचे सचिव दिपक कदम यांनी केले. आभार डॉ. राजा कदम यांनी मानले. कार्यक्रमाला शिव छत्रपती मराठा समाज समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीचे पदाधिकारी, सदस्यांसह शहरातील विविध समाजिक व सेवाभावी संघटनेचे पदाधिकारी सदस्य प्रतिनिधी यांच्यासह शासकिय वस्तीगृहाचे विद्यार्थी, शहरवासी बहुसंख्येने उपस्थित होते.