उमेंद्र बिसेन यांच्या कवितेची अ.भा.मराठी साहित्य संमेलनात निवड
आमगाव: ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टा या व्यासपीठावर आयोजक समीती द्वारे *बीज अंकुरे अंकुरे* ह्या कवितेची निवड झालेली असून निमंत्रित कवी उमेन्द्र बिसेन यांना आपली स्वरचित कविता सादरीकरण करण्याचा मान प्राप्त झाल्याबद्दल पोवार समाज एकता मंच पुर्व नागपुर महाराष्ट्र कडून व अखिल भारतीय क्षत्रिय पोवार/ पंवार महासंघ भारत कडून सहृदय सादर अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सहृदय मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्राचा सर्वात मोठा अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन व सुप्रसिद्ध कवीकट्टा व्यासपीठावरुन आपली स्वरचित कविता सादर मान उमेन्द्र बिसेन यांना मिळाला आहे. त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.