सालेकसा पोलिसांची धडक कारवाई- तस्करीसाठी जाणाऱ्या 140 जनावरांची सुटका

गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व आळा घालण्याकरीता पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे यांनी निर्देश दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर, यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव श्री.विजय भिसे यांचे मार्गदर्शनाखाली सालेकसा पोलिसांची अवैध धंद्याविरुद्ध विशेष धाड मोहीम सुरु आहे.

दिनांक 02/01/2022 रोजी मध्यरात्री मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे सालेकसा पोलीस ठाणे हद्दीत सीमावर्ती , नक्षलग्रस्त जंगल भागाचा फायदा घेऊन मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातून कत्तलीकरिता पाठविण्यासाठी गौवंशाची जनावरे आणून पानगाव व कहाली गावाच्या मध्ये असणाऱ्या निर्मनुष्य जंगल परिसरात 8-10 ग्रुप मध्ये 10-15 ठिकाणी गौवंशाची जनावरे कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने बांधून ठेवण्यात आलेली आहेत अशी माहिती मिळाल्याने सालेकसा पोलीस ठाणेचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी आपल्या चमुसह मिळालेल्या माहितीप्रमाणे मध्यरात्री घटनास्थळी पोहचून दिनांक 02/01/2022 चे रात्रीचे 12.30 वा.पासून दिनांक 03/01/22 चे सकाळी 09.00 वा.पर्यंत घटनास्थळ परिसरात शोध मोहीम राबवून वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून ठिक-ठिकाणी बांधलेली 140 गौवंशाची जनावरांची सुटका केली व ती जनावरे चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी व सांभाळण्यासाठी गौशाळेत जमा करण्यात आलेली असून सालेकसा पोलीस ठाणे येथे कलम 5(अ)(2),5(ब),6 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम 11 (च)(ज)(झ) प्राण्यांना निर्दयतेणे वागविण्यास प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर कारवाईमुळे परिसरातून पोलिसांचे कौतूक होत आहे.सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर व उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव श्री.विजय भिसे सर यांचे मार्गदर्शनात सालेकसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांचे नेतृत्वात पो.उप.नि.मुंडे, स.फौ.चौबे, ना.पो.शी निमजे ना.पो.शी.अग्निहोत्री, पो.शी.अजय इंगळे, पो.शी.सुजित बनसोड व इतर कर्मचारी यांनी केलेली आहे.

Share