लोहारा येथे धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन

देवरी: तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी संस्था लोहारा या धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन केंद्राचे अध्यक्ष राजू राऊत यांचे हस्ते 4 डिसेंबर रोजी करण्यात आले.

या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष कृपासागर गौपाले, लोहाराचे सरपंच पन्नालाल चौधरी, सुरतुली चारभाटाचे सरपंच कैलास मरसकोल्हे, मोहनटोल्याचे पोलिस पाटील राजेश क्षीरसागर, लोहाराचे पोलिस पाटील सत्यशीला टेंभुरकर, संस्थेचे संचालक धनराज चुटे, तुकाराम धुर्वे, माणिक राऊत, बुधराम डूंभरे, दिलीप कांबळे, भोजराज उईके,कुंता राऊत, शेवंता चनाप आधीसह परिसरातील शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिव रवींद्र नाईक यांनी केले तर उपस्थितांचे आभार केंद्रप्रमुख राकेश सोनवाने यांनी मानले.

Share