भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा जाहीर सत्कार

गोंदिया: भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष चित्रा वाघ या 15 नोव्हेंबर रोजी गोंदिया दौर्‍यावर येत आहेत. दौर्‍यादरम्यान त्या महिला मोर्चा तर्फे महिला समाज भवनात आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित राहतील. यावेळी चित्रा वाघ यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम यांनी दिली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष केशवभाऊ मानकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत कार्यक्रमाला खासदार सुनिल मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी आमदार, जिल्हा परिषद सभापती, महिला मोर्चाचे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्ह्यातील मंडळ पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला सदस्य उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम यांनी दिली आहे.

Share