देवरी येथे निशुल्क नेत्ररोग निदान शिबीराचे यशस्वी आयोजन

■ लायंस क्लब देवरीच्या वतीने आयोजन

देवरी,ता.८: स्वांतत्र्याच्या अम्रुत महोत्सवा निमित्य देवरीच्या लायंस क्लबच्या वतीने नि:शुल्क नेत्ररोग निदान शिबीरासह सिकलसेल तपासणी शिबीराचे आयोजन रविवार (ता.६ नोव्हेंबर ) रोजी येथील पारस अक्वा येथे करण्यात आले होते.
या नेत्ररोग निदान शिबीरात महात्मे आय. बँक व आय. हास्पीटल,नागपूर यांना पाचारण करण्यात आले होते.
या शिबीराचे उद् घाटन लायंस क्लब देवरीचे अध्यक्ष पारस कटकवार यांच्या हस्ते आणी क्लबचे सचिव तथा न.पं. सभपति आफताब शेख (अन्नूभाई ) व क्लबचे कँबीनेट आफीसर तथा नगरसेवीका पिंकी कटकवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रसंगी क्लबच्या सदस्या सुधा अग्रवाल, पुष्ता नळपते, सुनीता पाटिल आणी सदस्य मनोज मेश्राम, अनिल मेश्राम, तारेश मेश्राम, महेन्द्र मोहबंशी, विजय पाटिल यांच्यासह क्लबचे इतर पदाधिकारी, सदस्य तसेच देवरी व परिसरातून नेत्र तपासणी आणी सिकलसेल तपासणी करण्याकरिता आलेले नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
या शिबीरात एकूण ३६५ नागरीकांनी आपल्या डोळ्याची तपासणी करून ७८ नागरीकांची नेत्र शस्त्रक्रियेकरीता निवड करण्यात आली आहे. तसेच सिकलसेल तपासणीत एकूण २०० नागरीकांची तपासणी करण्यात आली असून यात ९ नागरीक पाँझीटिव्ह निघाले. यांना उपचार व उपचार बाबद सविस्तर महिती देण्यात आले या शिबीराच्या आयोजना करिता नागपूर चे महात्मे आय. बँक व आय. हास्पीटल चे मुख्यकार्यकारी अधिकारी नेत्र तज्ञ डॉ. सचिन भुमकर आणी डॉ. अरविंद डोंगरवार यांच्या सह त्यांच्या संपूर्ण आरोग्य चमूने सहकार्य केले.

Share