गोंदियात उद्यापासून राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्द्या

गोंदिया: आमदार चषक बॉलबॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन गोंदियाच्या वतीने आ. विनोद अग्रवाल यांच्यातर्फे उपलब्ध निधितून 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून नप गटनेता घनश्याम पानतावणे, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटनचे अध्यक्ष डॉ. पी. के. पटेल, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव अतुल इंगळे, माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, प्रोग्रेसिव्ह शाळेचे संचालक नीरज कटकवार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष अजय इंगळे, ओंकार लिचडे आदी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share