पोलिस कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्या: सुजित अग्रवाल
देवरी 07: नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या पोलिस बांधव व भगिनींना यावर्षीही शासनाने दिवाळी बोनसपासून वंचित ठेवले आहे. राज्य शासनाने पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या तालुका अध्यक्ष सुजित अग्रवाल यांनी केली आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केलेला नाही. प्रसंगी २४ तास कर्तव्य बजवावे लागतात. अनेकदा प्रसंगावधान व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून पोलिस कर्मचारी नागरिकांच्या मदतीला धावून जातात. पोलिसांना प्रोत्साहन म्हणून इतर विभागांच्या कर्मचाऱ्याप्रमाणे सर्व सुविधा मिळायला हव्यात. अद्याप त्यांना दिवाळी भेट म्हणून बोनस जाहिर केलेला नाही. बोनस जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या तालुका अध्यक्ष सुजित अग्रवाल यांनी केली आहे.