देवरी येथे दमा या आजारावर मोफत औषध वितरण शिबीर ०९ ऑक्टोबर रोजी

देवरी 07:शरद ऋतुतील महत्वाच्या कोजागिरी पौर्णिमा आणि दमा किंवा अस्थमा या आजाराचा निकटचा संबंध असल्याने कोजागिरी पौर्णिमा चे औचित्य साधून माँ धुकेश्वरी मंदिर समिती,सुवर्णप्राशन फाऊंडेशन आणि दिनबंधु ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक माँ धुकेश्वरी मंदिर सभागृह देवरी येथे दि.०९ ऑक्टोबर २०२२ रोज रविवार ला सकाळी १०.०० ते २.०० पर्यंत दमा,जुनाट सर्दी,खोकला,एलर्जी असे आजार बरे होण्यासाठी मोफत आयुर्वेदिक औषध वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या आजाराची लक्षण असलेल्या रुग्णांनी या शिबिरात सहभागी होऊन या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन माँ धुकेश्वरी मंदिर समिती चे अध्यक्ष अ‍ॅड.प्रशांत संगीडवार, सुवर्णप्राशन फाऊंडेशन अध्यक्ष डॉ सुनील समरीत, आणि दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार यांनी केले आहे.

Share