गोंदिया जिल्ह्यातही सकाळपासून संततधार
गोंदिया: गत काही दिवसांपासून विश्रांतीवर असलेल्या Gondia पावसाने आज सोमवारी सकाळपासूनच पुन्हा जोरदार हजेरी लावली. अनेक भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसात आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शासकीय, निम शासकीय तसेच विविध आस्थापनामध्ये काम करणाऱ्या चाकरमाण्यांसह शालेय विद्यार्थ्यांची चांगलीच पंचायत झाल्याचे पहावयास मिळाले. शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने त्यातून वाट काढताना जनसामान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे. परतीचा पाऊस अधिक कालावधीच्या धान पिकाला लाभदायक असला तरी कमी कालावधीच्या धान पिकांना तो मारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. उकाड्यापासून हैराण असलेल्या जिल्हावासीयांना मात्र आजच्या पावसाने गारवा मिळाला आहे.