धानाची पेरणी करता असताना शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला

प्रहार टाईम्स
गोंदिया 24: जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील गहेलाटोला येथील शेतशिवारात वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला . सदर शेतकरी हा आपल्या शेतशिवारात धानाची पेरणी करण्याकरता गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला. जखमी शेतकऱ्याचे नाव राजेश कांबळे वय ३२ वर्ष असे आहे. घटनेची माहिती होताच गोरेगाव वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले असून जखमींला ग्रामीण रुग्णालयात हलविले. असुन त्याच्यावर उपचार सुरु आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतीचे कामे असतात शेतशिवारात शेतकरी शेतीकामे करण्याकरिता जात असतात परंतु दिवसेंदिवस होत असलेल्या वाघांच्या हल्ल्याने परिसरात दहशतीचे वातावरण कायम झाले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share