ब्लॉसमच्या शिक्षकांनी दिला पर्यावरण दिनानिमित्त पथनाट्यातून संदेश

◼️जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ब्लॉसम स्कुलच्या शिक्षकांनी दिला सामाजिक संदेश

देवरी 04: जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल येथिल शिक्षकांनी पथनाट्याच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा सामाजिक संदेश दिला.

शाळापूर्व तयारी अंतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या तयारी करत असतांना शाळेतील सर्व शिक्षकांनी प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात पथनाट्यात सहभाग घेतला होता.

पथनाट्याच्या यशासाठी शिक्षक नामदेव अंबादे , भोजराज तुरकर , सरिता थोटे , वैशाली मोहुर्ले , नितेश लाडे , विश्वप्रित निकोडे , चंद्रकांत बागडे , तनुजा भेलावे आदी शिक्षणाने सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share