प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी उपलब्ध करुन द्या : नगरसेवक संजय दरवडे

देवरी 28: प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी रखडल्याने देवरी नगरातील पक्क्या घरापासून वंचित लोकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेकडो लाभार्थी आपल्या पक्का घराची स्वप्ने रंगवीत असतांना निधी अभावी त्यांचे स्वप्न क्षणभंगुर ठरलेले आहे.

देवरी नगरातील लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळविण्यासाठी नगर सेवक संजय दरवडे यांनी क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांना निवेदनामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी उपलब्ध करून द्या अशी विनंती केली असून सन 2018-19 मध्ये देवरी नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 546 घरकुल मंजुर झालेले आहेत. परंतु म्हाडा कडुन वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्यामुळे बरेचशे बांधकाम अर्धवट आहेत. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांचे कुटूंबीय भाड्याच्या जागेत किंवा तात्पुरते तंबु तयार करुन राहत आहेत. पुढील पावसाळ्याचा विचार करता परीस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील परिस्थीतीचा विचार करता योग्य पाठपुरावा करुन घरकुल लाभार्थ्यांना त्वरीत निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती त्यांनी केली आहे.

Share