तायकांडो खेळात देवरी चे विध्यार्थी चमकले

डॉ. सुजित टेटे

देवरी 14 – गोंदिया जिल्हा तायकांडो असोसियशन अंतर्गत फर्स्ट नॅशनल ओपेन ऑनलाइन वर्चुयल युथ गेम 2020 चे 31 ऑक्टोबर 2020 ते 2 नोव्हेंबर 2020 पर्यन्त आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून या मध्ये देवरी याथिल तायकांडो अकॅडेमी च्या विध्यार्थ्यानी सहभाग घेतलेला होता त्यामध्ये महिला गट रेड बेल्ट मध्ये जान्हवी लांजेवर (गोल्ड मेडल ) हिमाणी लांजेवार (सिल्व्हर मेडल ), येलो बेल्ट सब जूनियर महिला यामध्ये तनिष्का विजय बोरूडे ( गोल्ड मेडल ) , कॅडेट जूनियर मध्ये चेतना संजय ठाकरे (गोल्ड मेडल ) , पुरुष जूनियर गटात – योजन कावळे (गोल्ड मेडल ) स्वीप किक्कींग सीनियर वेदान्त खोब्रागडे (गोल्ड मेडल ) या सर् स्पर्धकांनी स्पर्धेत उत्तम कामगिरी करून देवरी तालुक्याचे नाव रोशन केले आहे.

या सर्वांचा जिल्हा मुख्य प्रशिक्षक दुलीचंद मेश्राम , नरेश बोहरे , देवरी तालुका मुख्य प्रशिक्षक अमित मेश्राम , स्वप्नील ठाकरे , पुरुषोत्तम बागडे , सचिन बावनकर यांनी अभिनंदन केला.

Print Friendly, PDF & Email
Share