राजकीय पक्षात भर्ती सुरु !!!खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाला १०० लोकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश….

डॉ. सुजित टेटे

देवरी १३: माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस 12 डिसेंबरला देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने साजरा करण्यात आला.खा शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, देशाचं संरक्षणमंत्री पद, कृषीमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहे. सध्या शरद पवार हे राज्यसभा खासदार आहेत.पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमीत्त देवरी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. बाजार समितीचे माजी सभापती रमेश ताराम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात तालुकाध्यक्ष सी.के.बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील 100 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी गोपाल तिवारी,भैय्यालाल चांदेवार, मुकेश खरोले,दिपेश टेंभरे,मुन्नाजी अन्सारी,सुजित अग्रवाल,मोन्टी अन्सारी,ईन्दल अरकरा, राजेश बिझंलेकर, कैलाश कोडापे,महीला तालुका अद्यक्ष पार्बताबाई चांदेवार, अर्चना ताराम, सुमन ताई बिसेन, मंजुसा ताई वासनीक,कोमल खरोले,रिना राऊत,गिता मडावी,सविता बडवाईक, पुष्पा मस्के, प्रतिमा देशपांडे, प्रीयकां सलामे, प्रमीला गावड, प्रेमकला कोल्हारे, उषा तिवारी,माधुरी शहारे,मीनां कुभंरे,पुष्पा रहांगडाले , मनोहरराव राऊत, नेमिच॔द आंबीलकर , किशोर राऊत, भाष्कर धर्मशहारे, किशोर टेंभरे, अरविंद शेंडे, रवि बडवाईक , दिलिप कुंभरे , सत्यवान देशमुख, ममता गिरी, उषाताई तीवारी ,सुबोध देशपांडे, अशोक चनाप,प्रेमकला कोल्हारे,मीनाताई कुंभरे व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share