ब्रेकिंग: तरुणीवर अत्याचार करीत ऍसिड टाकून हत्या, तरुणीचा मृतदेह आढळला जंगल परिसरात

आमगाव 21: गोंदिया जिल्याच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कुंभारटोली जंगल परिसरात एका १५ ते १७ वर्षीय तरुणीवर अत्याचार करीत एडिस टाकून हत्या करीत मृतदेह जंगल परिसरात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे . आज सकाळी कुंभारटोली गावातील काही लोक जगल परिसरात सरपण वेचण्या करीता गेले असताना गावकर्यांना मुलीचे मृतदेह दिसताच याची माहिती आमगाव पोलिसांना दिली असून .पोलिसांनी घटना स्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत स्व विच्छेदना करिता ग्रामीण रुग्णायात पाठविले असून हि घटना काल रात्री घडली असून काही अज्ञान इसमांनी ह्या तरुणीवर आत्याचार करीत तोंडावर एडिस टाकून हत्या करीत पढ काढले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून आमगाव पोलिश आरोपीचा शोध घेत आहे.

अशी उघडकीस आली घटना

आज सकाळी कुंभारटोलीचे काही जण जंगलात सरपणासाठी गेले होते. तेव्हा त्यांना तिथं अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडला. ही घटना पाहून त्यांना धक्काच बसला. शेवटी त्यांनी या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना दिली. आमगाव पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

जंगलात फेकला मृतदेह

या घटनेचा तपास करण्यासाठी श्वानपथक बोलावण्यात आलंय. गुन्हे शाखेचे पोलीस गोंदियावरून आले आहेत. आरोपींनी तिची हत्या केल्यानंतर तिचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. काल रात्रीच ही धक्कादायक घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही तरुणी कुठली आहे. तिची हत्या का करण्यात आली, हे सर्व प्रश्न सध्यातरी निर्माण झाले आहेत. आमगाव पोलीस याचा तपास करत आहे. कुठल्या पोलीस ठाण्यात तरुणीची मिसिंग तक्रार आहे का, याची माहिती मागविली जात आहे.

Share