देवरी: सावली-डोंगरगाव रस्ता अपघातात एक ठार

देवरी 06: तालुक्यातील आमगाव देवरी रस्त्यावर स्थित डोंगरगाव- सावली दरम्यान असलेल्या नाल्याजवळ रात्री 10 वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने एका पादचारी युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.अपघातातील मृताचे नाव देवेंद्र तुकाराम शहारे (वय 27) राहणार मुल्ला, तालुका देवरी असे आहे.

सविस्तर वृत्त असे कि मृत देवेंद्र हा आमगाव तालुक्यातील मोहनटोला येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीची भेट घेऊन गावी परत येत असताना तो डोंगरगावपर्यंत वाहनाने आला. पुढे वाहन न मिळाल्याने तो मुल्ला येथे येण्यासाठी पायी निघाला असताना सावली-डोंगरगाव दरम्यान असलेल्या नाल्यावर त्याला एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
पुढील तपास सालेकसा पोलिस करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share