जुगार खेळणार्या पाच जणांवर गुन्हा दाखल
गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 30 मार्च रोजी आमगाव पोलिस हद्दीतील सुपलीपार शेतशिवारात जुगार खेळणार्या पाच जणांवर कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून 51 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुपलीपार परिसरात गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका शेतात काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने धाड टाकून सतीश मेंढे (32), संतोष मेंढे (37) दोन्ही रा.सुपलीपार, टिकाराम भांडारकर (54) रा.भोसा, तिर्थराज बंसोड (53) रा.डोंगरगाव व सहेषराम बिसेन (50) रा.टेकरी यांच्यावर कलम 12 (अ) मजुआ अन्वये कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून रोख 20 हजार 500 रुपये, 31 हजाराचे 4 मोबाईल, पत्ते असा 50 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, सहायक फौजदार कापगते, पोलिस हवालदार तुलसीदाल लुटे, विठ्ठलप्रसाद ठाकरे, पोलिस नायक रियाज शेख, चेतन पटले, पोलिस शिपाई संतोष केदार, विजय मानकर यांनी केली.