ब्लॉसम पब्लिक स्कुलमध्ये आनंदमेळा उत्साहात साजरा

◾️6 दिवसीय ब्लॉसम फेस्टिवलची आनंदमेळ्याने सांगता

देवरी 26: (प्रहार टाईम्स) ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे सहा दिवशीय ब्लॉसम फेस्टिवलची सांगता आनंदमेळ्याने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या सह शाळेतील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पूजन करून आणि फित कापून करण्यात आले.

सदर 6 दिवसीय कार्य्रक्रमात इंग्रजी संभाषण , हस्तकला , चित्रकला, मूल्यशिक्षण तसेच कला कौशल्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. आनंदमेळा मध्ये 25-30 विद्यार्थ्यांनी आपले स्टॉल्स लावले होते आणि ते आकर्षणाचा केंद्र ठरले.

विद्यार्थ्यांनी जीवनात त्यांना व्यावसायिक ज्ञान मिळावे या उद्देशाने सदर आनंदमेळाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षक विश्वप्रित निकोडे , नितेश लाडे , हर्षदा चारमोडे योगिता कोशरकर आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share