पं.स. व जि.प. सभापती व इतर सदस्यांची प्रलंबित पदाधिकारी निवडणूक घ्या- भाजप

देवरी 26: पंचायत समिती व जिल्हा परिषद सभापती व इतर सदस्यांची प्रलंबित पदाधिकारी निवडणूक घेणे याबाबत मा. राज्यपाल महोदय व मुख्यमंत्री यांना भाजपा देवरी मंडळाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. भाजपच्या शिष्टमंडळात संजय भाऊ पुराम माजी आमदार आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र व महाराष्ट्र प्रदेश सचिव भाजपा तालुकाअध्यक्ष भाजपा अनिलजी येरने ,तालुका महामंत्री प्रवीणभाऊ दहीकर ,पंचायत समिती गटनेते शालिकरामजी गुरनुले, प.स. सदस्य अनिलजी बिसेन,प.स.सदस्या सौ. अंबिकाताई बंजार, प.स.सदस्या सौ. शामकलाताई गावड,प.स.सदस्या वैशालीताई पंधरे,प.स.सदस्या ममताताई अंबादे, बंटीजी भाटीया, छोटुजी भाटीया, नितेश वालोदे,विठ्ठलजी गावड,विजयजी मडावी आदी उपस्थित होते.

Share