देवरी येथे दुचाकिला वाहनाची धड़क, एक गंभीर जखमी

देवरी हायवे मार्ग क्रं.६ वरील श्री अग्रेसन चौकासमोरील घटना

देवरी 10: देवरी येथील हायवे मार्ग क्र. ०६ वरील श्री. अग्रेसन चौकासमोर नागपुर कडून रायपुर कड़े कजाणाऱ्या वाहनाने स्कूटी दुचाकीला जोरदार धड़क दिली या घटनेत दुचाकी सवार मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ह्या मुलीला अधिकच्या उपचारार्थ गोंदिया येथे हलविन्यात आले आहे.
गंभीर जखमी मुलीचे नाव- देविका देवीदयाल शाहु वय २२ रा. पंचशील चौक देवरी असे असून ही मुलगी आपल्या स्कूटी दुचाकी वाहन क्र. एम. एच. ३५. ए-बी. ८०४६ ने आपल्या मैत्रीणिला हायवे मार्गावर सोडून परत आपल्या घरी जात असतांना हायवे मार्ग क्र. ०६ वरील श्री. अग्रेसन चौकासमोर नागपुर कडून रायपुर कड़े बायलर कोम्बड्या घेवून जाणारा वाहन क्र. टी. एस. ०२ यू. सी. ८८११ने जोरदार धड़क दिली. या धड़केनंतर सदर वाहन रोडावर उलटला. या घटनेत दुचाकी सवार मुलगी ही गंभीर जखमी झाली. हिला प्रथम देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात भर्ती करण्यात आले. परंतु हिची प्रकृति गंभीर असल्याने हिला अधिकच्या उपचारार्थ गोंदियाला हलविन्यात आले.
या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून पुढील तपास देवरी पोलिस करित आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share