नगरपंचायत देवरी: भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा

देवरी 16: नगरपंचायतीवर 17 जागांपैकी 11 जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे नगरपंचायतीवर भाजपची सत्ता जवळपास निश्चित होती. नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत अनुसूचित जमातीच्या सर्वसामान्य प्रवर्गाला गेली. अखेर पक्षातर्फे नगराध्यक्षपदासाठी संजू उईके यांची निवड करण्यात आली.

जल्लोष साजरा करतांना

विशेष म्हणजे नगरपंचायत देवरीचे उपाध्यक्ष कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते नुकताच प्रज्ञा प्रमोद संगीडवार यांना उपाध्यक्षाची माळ घालण्यात आली असून त्यांना भाजप चे 11 मते आणि राष्ट्रवादी चे 2 मते असे 13 मते मिळाली असून त्यांचा स्पष्ट बहूताने विजय झाला.

काँग्रेस तर्फे शरबजितसिंग भाटिया यांना पक्षाचे 4 मते मिळाली. अखेर बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असलेल्या नगरपंचायत देवरी वर कमल फुलले असून माजी आमदार संजय पुराम , अनिल येरणे , प्रमोद संगीडवार , महेश जैन तसेच पक्षाच्या कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Share