देवरी : BMW कारचा मोठा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

देवरी 09: राष्ट्रीय महामार्ग 6 वरून नागपूर कडून रायपूरच्या दिशेने आपल्या BMW कारनी प्रवास करणाऱ्या 2 वकिलांचा देवरी येथील एक्सिस बँक ते जैन मंदिर परिसरात मोठा अपघात झाला . अपघात इतका भीषण होता कि BMW कार चक्क चित्रपटातील दृश्यासारखे हवेत पलट्यामारत डिव्हायडर ओलांडत दुसऱ्या बाजूला येऊन पडली.

प्राप्त माहितीनुसार सदर कार मध्ये नागपूर येथील वकील ऍड. योगेंद्र बंदानी आणि ऍड. दारा सिंग आपल्या MH 31 FE 5152 क्रमांकाच्या BMW कार मधून प्रवास करीत होते. कार वरील नियंत्रण सुटल्याने कार फेंचिंग ला आपटली त्यामुळे कार नियंत्रणाबाहेर गेली आणि दुसऱ्या बाजूला डिव्हायडर ओलांडून पलटली. यावेळी कार चे दोन्ही टायर फुटले असून कार चे मोठे नुकसान झाले आहे .

Print Friendly, PDF & Email
Share