ब्लॉसम स्कुल येथे वसंत पंचमी साजरी

देवरी 05: तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे वंसत पंचमी साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे , शिक्षक नामदेव अंबादे , वैशाली मोहुर्ले , हर्षदा चारमोडे , सरिता थोटे , योगिता कोसरकर मंचावर उपस्थित होते.

वंसत महिन्याच्या सुरुवातीला वसंत पंचमी साजरी केली जाते . विशेष म्हणजे यादिवशी विध्येचा आराध्य दैवत माँ सरस्वती यांची जयंती साजरी केली जाते हे विशेष. वेगवेगळ्या राज्यात विविध प्रकारे वसंत पंचमी साजरी केली जाते. यावेळी मान्यवरांनी वसंत पंचमी यानिमित्त आपले मनोगत मांडले. विद्यार्थ्यांनी सामूहिक सरस्वती स्तवन गायन केले.

दरम्यान प्राचार्य डॉ सुजित टेटे यांनी शालेय जीवनात विविध सहशालेय उपक्रम , जयंती यांचे विद्यार्थी जीवनातील महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्कृती लांजेवार आणि युसरा भुरा या विद्यार्थिनींनी केले.

Print Friendly, PDF & Email
Share