■ आमदार कोरोटे यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन
देवरी 24: आमदार कोरोटे यांच्या देवरी येथील निवासस्थानी गोंदिया जिल्ह्यातील आमगांव, गोरेगांव व मोरगांव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत सदस्यांच तसेच सालेकसा येथील जिल्हा काँग्रेस चे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे यांचा सत्कार आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप बंसोड़ हे होते. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पर्यवेक्षक नाना गावंडे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे स्वीय सहाय्य राजू पालीवाल, माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, महासचिव अमर वराडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष जितेंद्र कटरे, सालेकसा पं.स.चे माजी सभापती यादनलाल बनोटे, सालेकसा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वासुदेव चुटे, देवरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया, काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ता राजू काळे, महासचिव बळीराम कोटवार यांच्या सह काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जि.प., पं.स. व नगरपंचायतीच्या सदस्याचे आणि सालेकसा येथील माजी जिल्ह्याध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे यांचा आमदार सहषराम कोरोटे व उपस्थित इतर पदाधिकाऱ्यांचा हस्ते शाल श्रीफळ, व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन अविनाश टेमभरे यांनी तर उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांनी मानले.








