कोरोना काळात DOLO 650 गोळीने जमवला तब्बल ५६७ कोटींचा गल्ला !
प्रहार टाईम्स : ताप आला, डोकं दुखलं किंवा अंग दुखायला लागलं तर आपण सरळ मेडिकलमध्ये जाता आणि पॅरासिटोमोलची गोळी घेता ना? कोरोना महामारीच्या काळात तर लस टोचली की, तीच गोळी दिली जायची. साहजिक त्याचा खप जास्त असला पाहिजे हो ना? पण, तुम्ही चुकीचे आहात. कारण, मार्च 2020 पासून Dolo 650 नावाच्या गोळीची प्रचंड प्रमाणात विक्री झाली आहे. तब्बल 567 कोटींची विक्री झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जेव्हा आपण होतो, जो-तो हीच गोळी खात होता. त्यामुळे भारतीयांचा ‘आवडता स्नॅक’ या गोळीला म्हंटलं जात आहे. सोशल मीडियावर त्यासंदर्भात ट्रेंड सुरू झाला, मोठ्या प्रमाणात मिम्स बनविण्यात आले.
Dolo 650 या गोळीचा खप किती झाला?
इतक गोळ्यांच्या तुलनेत Dolo 650 सर्वांचा भारी पडली ना राव… विक्रीचा आलेखा काढला तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर Dolo 650 आहे. त्यानंतर Calpol आणि Sumo L या गोळ्यांचा दुसऱ्या क्रमांकावर लागतो. आपल्या देशात तब्बल 37 ‘पॅरासिटोमोलचे ब्रॅण्ड’ विक्री करतात. तर पॅरासिटोमोलमध्ये Dolo 650 आणि Calpol या गोळ्या विक्रीमध्ये आघाडीवर आहेत.
बंगळुरुमध्ये असणाऱ्या मायक्रो लॅब्स लिमिटेड कंपनीकडून डोलो 650 ची निर्मिती केली जाते. त्यात डाॅक्टरांकडूनही हीच गोळी मोठ्या प्रमाणावर लिहून दिली जाते. डिसेंबर 2020 मध्ये Dolo 650 गोळ्यांची विक्री 28.9 कोटी होती. 2021 मध्ये यामध्ये तुलनेत 61.45 टक्क्यांना वाढ झाली. मार्च-एप्रिल 2021 मध्ये डोलो 650 ची विक्री सर्वाेच्च झाली. ती तब्बल 48 कोटीपर्यंत विक्री झाली होती. Fepanil,[an
डोलो 650 च्या विक्रीच्या तुलनेत Calpol ची विक्री पाहिली तर डिसेंबर 2021 मध्ये २८ कोटी अर्थात 56 टक्क्यांची ही वाढ होती. दुसऱ्या लाटेत मात्र Calpol ची सर्वांत जास्त विक्री झाली होती. तब्बल 71.6 कोटींची विक्री झाली.
P-250, Pacimol आणि Crocin या गोळ्यादेखील पॅरासिटोलमध्ये आघाडीवर आहेत.
Dolo 650 ही गोळीच का?
डाॅक्टरांकडून क्रोसिनव्यतिरिक्त डोलो 650 हे औषध जास्त प्रमाणात लिहून देत आहेत. कारण, सर्व वयोगटातील लोकांना ही गोळी चालते. त्याचबरोबर त्याचे कमीत कमी दुष्परिणाम आहेत, असं डॉक्टर आणि फार्मास्युटिकल असोसिएशनकडून सांगण्यात आलं. काही डाॅक्टर असं सांगतात की, “इतर पॅरोसिटोमोल गोळ्यांप्रमाणे डोलो 650 हादेखील एक ब्रॅण्ड आहे. ते काही वेगळे नाही. सर्व वयोगटातील लोक, हृदयविकार, किडनीचे आजार आणि मधुमेह ग्रस्त असलेले लोक ही गोळी घेऊ शकतात.”
Dolo 650 ची निर्मिती कोण करतं? मालक कोण?
बंगळुरू येथे मायक्रो लॅब्स लिमिटेड या खासगी कंपनीतून डोलो 650 ची निर्मिती केली जाते. 1973 मध्ये जी. सी. सुराणा यांनी ही कंपनी स्थापन केली होती. सध्या त्यांचा मुलगा दिलीप सुराणा या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. या कंपनीची उलाढाल 2 हजार 700 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये 920 कोटी रुपयांची उलाढाल ही निर्यातीवरील आहे.