हे काय ! लस नाही तर दारु नाही, लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी नवी शक्कल
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण केवळ 64 टक्के इतके आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी नोटीस बजावल्याने आता जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे.
औरंगाबादमध्ये लसीचा किमान एक डोस घेतल्या शिवाय आता दारू तर मिळणार नाहीच, मात्र बारमध्ये बसूनही दारू पिता येणार नाही. त्यामुळे मद्यप्रेमींची चांगलीच गोची झाली आहे. यापूर्वी पेट्रोल, गॅस, किराणा, कपडे खरेदीसाठी लसीकरण सक्तीचे करण्यात आले होते. तरीही टक्का वाढत नसल्याने प्रशासनाने थेट दारू खरेदीसाठीही लसीची अट घातली आहे. इतकेच नव्हे तर हॉटेलमध्येही लस घेतलेल्या ग्राहकांनाच सेवा दिली जाणार आहे.
औरंगाबादमध्ये मद्यप्रेमींनी नवीन नियमाचा धसका घेतला. तर दारू दुकानदारांनी या नियमाला विरोध केलेला नाही. केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाड्यात कोरोना लसीकरणाचा टक्का घसरलाय. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.