महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा

देवरी 21: श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना देवरी द्वारा पुराडा येथे दि 21 ला महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे अनावरण सोहळा संपन्न झाला.

सदर स्मारकाचे अनावरण करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अर्जुन सिंग ठाकूर , छत्तीसगड अध्यक्ष वीरेंद्रसिंघ तोमर ,राष्ट्रीय महासचिव आनंदसिंघ धोके , राजीव शक्करवार , प्रताप शुक्ला यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी करणी सेना तालुका कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share