महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे उद्या अनावरण सोहळा

देवरी 20: श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना देवरी द्वारा पुराडा येथे दि 21 ला महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे अनावरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रम खा. प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अर्जुन सिंग ठाकूर , छत्तीसगड अध्यक्ष वीरेंद्रसिंघ तोमर , आमदार सहषराम कोरोटे ,माजी आमदार संजय पुराम व राजेंद्र जैन , राष्ट्रीय महासचिव आनंदसिंघ धोके , सोनाली ठाकूर , राजीव शक्करवार , प्रताप शुक्ला यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

सदर स्मारक अनावरण सोहळ्याला कोरोना नियमाचे पालन करून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे देवरी करणी सेनेने आवाहन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share