राज्यभर नवरात्रोत्सव…गरबा खेळण्यास परवानगी पण मास्क बंधनकारक
मुंबई: महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित आकडेवारीत लक्षणीय घट होत असतांना, निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यंदा सणांच्या उत्सवात गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवदेखील साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात उघड्यावर गरबा खेळायचा असल्यास सोशल डिस्टनसींग आणि मास्क बंधनकारक असणार आहे. तसेच सभागृहात गरबा खेळायचा असेल तर मास्क आणि सभागृहात फक्त एकूण क्षमतेच्या 50 टक्केच लोक उपस्थित राहतील याची दक्षता सभागृहाच्या मालकाने घ्यायची आहे, अश्या सूचना महानगरपालिकेकडून करण्यात आल्या आहेत.
संपूर्ण राज्यभर नवरात्रोत्सवात तीन पध्दतीने गरबा खेळला जातो. या उत्सवात गरबा खेळण्यास सांस्कृतिक विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. गरबा खेळादरम्यान सेवा देणाऱ्या लोकांनी म्हणजेच केटरिंग वाल्यांनी दोन्हीही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनें लहान मुलांसाठी इम्युनिटी बुस्टींग किट बनवली असून, लहान मुलांसाठी ती उपयुक्त ठरेल हा स्वागतार्ह निर्णय आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.