अनिल देशमुखांच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्सची छापेमारी
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर आज इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली आहे. नागपुरातील त्यांच्या मालमत्तेवर इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला आहे.
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी इन्कम टॅक्स विभागाची टीम दाखल झाली आहे. नागपुरातील जीपीओ चौक येथील निवास स्थानावर इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांच्या काटोल निवास स्थानावर देखील इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यासोबतच नागपूरच्या हॉटेल ट्राव्होटेल येथे देखील इन्कम टॅक्सने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे.