देवरी येथे शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन

देवरी 4: गोरगरीब व गरजू उपाशीपोटी राहू नयेत म्हणून राज्य शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार शहरातील मिश्रा भोजनालय च्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोफत शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन सुरेंद्र जी नायडू शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुनील मिश्रा तालुकाप्रमुख , राजा भाटिया शहर प्रमुख, अनिल कुर्वे शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष , राजिक खान विधानसभा संघटक, कगेस राव युवासेना जिल्हाधिकारी, सुभाष जी दुबे शिक्षक सेना तालुकाध्यक्ष, दीनदयाल जी मेश्राम,सुहाग गिरी, नेवरगडे, राजा मिश्रा, प्रमोद जी भैसारे, सचिन भांडारकर, डॉक्टर भूमेष पटले, सोनू जी भाटिया, पिकुजी ,शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक व इतर नागरिक आदींची उपस्थिती होती. या मोफत शिवभोजन केंद्राच्या वतीने दररोज 100 गोरगरीब व गरजू नागरिकांना भोजन देण्यात येत आहे.

Share