तलवारीने केक कापणे पडले महागात

भंडारा : वाढदिवसाच्या दिवशी तलवारी घेऊन केक कापणे व भाईगिरी करत व्हाट्सएपवर व्हिडीओ व्हायरल करणे दोन युवकांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी गुन्हा नोंद करून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा तालुक्यातील भोजापुर येथील सुभाष वार्ड परिसरात संबधित घटना घडली. या प्रकरणी निखिल उर्फ निकेश अंकुश बावने (वय 22) व गणेश राजेश बागडे (वय 20) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून दोन्ही तलवारी जप्त करण्यात आल्या आहे.

23 ऑगस्टला निखिल उर्फ निकेश अंकुश बावने व गणेश राजेश बागडे या दोघांचा वाढदिवस होता. घटनेच्या दिवशी आरोपींनी भोजापुर येथील सुभाष वार्ड परिसरात वाढदिवस साजरा करत असताना केक कापण्यासाठी तलावारींचा वापर केला. शिवाय तलवारी घेऊन त्याचे फोटो सेशन केले. 

इतकेच नाही तर चक्क त्यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर भंडारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. काल 2 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करत दोन लोखंडी तलवारी जप्त केल्या आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें