मोबाइल टाँवर च्या बॅटरीची चोरी
चिचगड 03: चिचगड येथे रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी विजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा टावर च्या एकूण 24 बॅटऱ्या पैकी 22 बॅटऱ्या रात्री दहाच्या सुमारास चोरी करून चोरटे लंपास झाल्याची घटना चिचगड येथे घडली आहे.चोरी गेलेल्या बॅटरी चे एकाचे वजन 30 किलो जवळ पास होते.22 बॅटऱ्या चोरी गेल्याची तक्रार दोन तारखेला चिचगड पोलीस स्टेशनला देण्यात आली.
बॅटरीची अंदाजे रक्कम. 1 लाख 47 हजार 823 रुपये असे सांगण्यात आले. त्यानुसार गुन्हा नोंद करून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास PSI मनोहर इस्कापे करीत आहेत.