आमदार कोरोटे यांच्या हस्ते विविध बांधकामाचे भूमिपूजन
देवरी : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात विविध बांधकामाचे भूमिपूजन आज रविवार, 29 ऑगस्ट रोजी आमदार सहेसराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामपंचायत बोरगाव-बाजार येथे सीमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने देवरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप भाटिया, बोरगावच्या सरपंच कल्पना देशमुख, बळीराम कोटवार, कैलास देशमुख, प्रदीप देशमुख, पांडुरंग कर्मकार, दयाराम देशमुख, पुनाराम तुलावी, कृपा देशमुख, तानबा भोंगाडे, गोपाल भोंगाडे, संतोष कर्मकार, सुरेश भोंगाडे, प्रभाकर देशमुख, मयाराम कुंजाम, कांतीलाल देशमुख, अशोक देशमुख, परिसरातील काँग्रेसकार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.
ग्रामपंचायत चिल्हाटी येथे चावळी बांधकामाचे भूमिपूजन आ.कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप भाटिया, चिल्हाटीच्या सरपंच पुस्तकला मडावी, चैनसिंग मडावी, उपसरपंच राम हिरवानी, माजी पं.स. सदस्य भरत नाकाम, उत्तम मरकाम, अमरदास सोनबोईर, बबलु भाटीया, बळीराम कोटवार, ब्रिजलाल सोनबान, बाबुराव हीडको, उत्तम कुवरदादरा, नरेन्द्र सांडील, काँग्रेस कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.
परिचय संमेलनात उपस्थित
देवरी येथे भारतीय तैलीक साहु राठौर महासभा, जम जाये जोड़ी ग्रुप द्वारा आयोजित परिचय संमेलनात उपस्थित राहून आमदार कोरोटे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रामुख्याने संचालक रामनारायन शाहु, उमेश शाहु, प्रल्हाद मोदी, सुनिल शाहु, अशोक शाहु, माजी आमदार संजय पुराम, उषा शाहु, सोनू शाहु व शाहु समाजातील सर्व समाजबांधव उपस्थित होते.