गोंदिया जिल्हातील 7 पोलीस अधिकाऱ्यांची जिल्हांतर्गत बदली

गोंदिया 27: जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी गोंदिया जिल्हातील विविध ठिकाणी कार्यरत 7 पोलीस अधिकाऱ्यांची जिल्हांतर्गत बदलीचे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ पदभार स्वीकारून त्या संबंधीचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालय यांना सुफूर्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

प्राप्त माहितीनुसार अर्जुनी मोर चे पोलीस निरीक्षक महादेव तोंडले यांची बदली जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष येथे केलेली आहे. रामनगर चे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांची बदली जिल्हा विशेष शाखा, रावणवाडी चे पोलीस निरीक्षक देविदास कठाडे यांचा रामनगर येथे , आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचा रावणवाडी येथे , नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांचा अर्जुनी मोर येथे स्थानांतर करण्यात आला आहे.

त्याच बरोबर 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांमधून शरद पाटील यांचा नक्षल सेल गोंदिया वरून चिचगड पोलीस ठाणे येथे आणि अरविंद राऊत यांचा स्थानांतर सालेकसा पोलीस ठाणे येथे करण्यात आलेला आहे. सोबतच बाळासाहेब बोरसे यांना एसपी कार्यालय पोलीस उप अधीक्षक (गृह) अतिरिक्त काम देण्यात आलेला आहे.

Share