राष्ट्रीय एकात्मता या पुरस्काराने डॉ. सुजित टेटे व वैशाली टेटे दांपत्य सन्मानित गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब

सुदर्शन एम. लांडेकर

उपसंपादक प्रहारTimes

गोंदिया :देवरी तालुक्यातील ब्लाॅसम पब्लिक स्कूल देवरीचे प्राचार्य डॉ. सुजित हंसराज टेटे व वैशाली टेटे हे दाम्पत्य “राष्ट्रीय एकात्मता” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा -२०२०” या कार्यक्रमात महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा “राष्ट्रीय एकात्मता” पुरस्काराने ६ नोव्हेंबरला रेसिडेन्सी क्लब बुलढाणा येथे भव्य समारंभात गौरवण्यात आले.

या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मुकेश झंवर, मुख्य मॅनेजिंग डायरेक्टर बुलढाणा अर्बन, रमेश घेवंदे, अपर जिल्हाधिकारी बुलढाणा, विजयराज शिंदे, आमदार, बुलढाणा, किरण डोंगरदिवे, साहित्यिक,कवी,लेखक मेहकर लक्ष्मीकांत बगाडे, दिव्य मराठी,जिल्हा प्रतिनिधी, बुलढाणा अजय सिंह सिंगर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय क्षेत्रिय महासभा प्रमोदसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय क्षेत्रिय महासभा,आशिष खडसे, महाराष्ट्र चिफ डायरेक्टर, दिव्या फाऊंडेशन , अशोक काकडे संस्थापक दिव्या फाऊंडेशन यांचे हस्ते ” डॉ. सुजित टेटे व वैशाली टेटे यांना सन्मानित करण्यात आले.

विविध शैक्षणिक व सामाजिक प्रयोग व उपक्रमाद्वारे आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी व त्यांच्या भावी आयुष्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. तसेच काळानुरूप तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल करत आहेत. शिक्षण क्षेत्रात करत असलेले अविरत परिश्रम, महत्वपूर्ण बदल व देत असलेले योगदान यामुळे दिव्या फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बुलढाणा या संस्थेसाठी डॉ.सुजित टेटे दाम्पत्य हे आदर्श ठरले आहेत. म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व प्रेम व्यक्त करण्यासाठी दिव्या फाऊंडेशनतर्फे सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन राष्ट्रीय “एकात्मता पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

डॉ.सुजित टेटे हे उच्चशिक्षित असुन त्यानी इंग्रजी विषयात स्नातकेत्तर पदवी व शिक्षणशास्त्राची पदवी घेतली असुन पीएच.डी. व डी लिट ने सन्मानित आहेत.त्याचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिक व वृत्तपत्रात त्याचे प्रंबध प्रकाशित आहेत. अनेक लेख व कविता वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या असुन अनेक सेवाभावी संस्थेचे ते मानद सदस्य आहेत. काव्य लहरी, माॅरल स्टोरी, माझे माझ्याशीच स्पर्धा ह्या पुस्तकांचे ते लेखक आहेत. परिवर्तन द चेंज, Determinetion of struggle व Notebook हे लघुचित्रपटाचे ते निर्माते आहेत. तसेच ते शोध पत्रकारिता करित असुन प्रहार टाईम्स हा त्यांचा स्वतंत्र ब्लाग आहे.

एकात्मता पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. सुजित टेटे व वैशाली टेटे दाम्पत्यांचा या सन्मानाबाबद त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Share