लाखनी शहरात अवैद्य धंद्यांना ऊत
तुषार हर्षे / तालुका प्रतिनिधी
लाखनी दि.४ : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना महामारी मुळे लॉकडाउन होते आणि या कालावधीमध्ये सर्व आर्थिक धंदे मंदावले होते या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या व्यवसायाला उधान आला असून दारू जुगार सट्टा मोठ्या प्रमाणात चालत आहे यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल केली जाते मात्र सामान्य शेकडो कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले आहेत परंतु संबंधित विभागाचे दुर्लक्ष केले जाते असुन पोलिस अधीक्षक भंडारा यांनी समस्यांची दखल घेऊन अवैध धंदे करणार्या लोकांवर कारवाई करावी अशी तालुक्यातील स्थानिक सुजाण नागरिकांची मागणी आहे.