‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात लाराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनेही केले लग्न

‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात लाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री एवलिन शर्माने १५ मे रोजी लग्न केले आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे.

एवलिनने बॉयफ्रेंड तुशान भिंडीशी लग्न केले आहे. तो ऑस्ट्रेलियात राहत असून एक डॉक्टर आहे. १५ मे रोजी त्यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे लग्न केले. २०१९मध्ये एवलिन व तुशानने साखरपूडा केला होता. एवलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ब्रायडल लूकमध्ये सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने ‘फॉरएव्हर’ असे कॅप्शन दिले आहे.

तुशानने एवलिनला सिडनीमधील हार्बर ब्रीजवर प्रपोज केले होते आणि खूश करण्यासाठी एक खास नोट देखील लिहिली होती. एवलिनने स्वत: याबाबत खुलासा केला होता. तुशान हा एक ऑस्ट्रीलियामध्ये राहणारा एक डेंटल सर्जन आहे.

Print Friendly, PDF & Email
Share