वाघाच्या हल्ल्यातून दोघांना वाचवून पुन्हा ठरले देवदूत राजू चांदेवार

धावत्या दुचाकीवर वाघाचा हल्ला, थोडक्यात बचावले दुचाकीस्वार

डॉ. सुजीत टेटे

देवरी 3 – गोंदिया कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल शिवारात सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास प्रवाश करीत असलेल्या दोन दुचाकीस्वारावर अचानक वाघाने हल्ला केल्यामुळे खाली पडले त्यांच्या मागोमाग माजी जि. प . सदस्य राजू चांदेवार आपल्या चारचाकी वाहनाने जात असतांना प्रसंगावधान साधून आपल्या जिवाची पर्वा न करता दोघांना आपल्या वाहनात ओढून घेतले आणि घटनास्थळावरून हलवले. सदर घटनेमध्ये बचावलेल्या दोघांची नवे रंजीत परशुरामकर (35) , दाणेश गहाणे (40) असे आहेत.

सविस्तर वृत्त असे की खाडीपार येथील रंजीत परशुरामकर आणि दाणेश गाहाणे आपल्या दुचाकीने गोरेगाव कडून डव्वाकडे जात असताना सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मुंडीपार आणि मुरदोली या दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगल शिवारात अचानक रस्त्याच्या एका बाजूने वाघाने हल्ला केला झपाटलेल्या वाघाच्या हल्ल्यात दोघे खाली पडले मागून राजू चांदेवार यांचे चारचाकी वाहन येत असतांना प्रकाशामुळे वाघाने दुसर्‍या बाजूला उडी घेतली सदर चित्तथरारक प्रकार रस्त्यांनी जाणार्‍या लोकांनी प्रत्यक्ष बघितला असून त्यांना झालेल्या प्रकाराची विचारपूस करायला उतरलेल्या राजू चांदेवार यांच्या वर सुद्धा दबा धरून बसलेले वाघाने हल्ला केला. प्रसंगावधान साधून दोन्ही जखमी लोकांना आपल्या वाहनात ढकळून पुन्हा दोघांचे जीव वाचवून राजू चांदेवार देवदूत ठरले.

जखमी झालेल्या दोघांना त्यांच्या गावापर्यंत सोडून प्रथोमोपचार करण्यात आला असून ते सद्या सुखरूप आहेत. राजू चांदेवार नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जात असतात आणि परिसरातील लोक कुठल्याही कामासाठी त्यांची मदत घेत असतात. गावातील समस्या असो , कार्यालयीन कामकाज असो , अपघातात जखमी झालेले लोक असो सर्वांना मदत करण्यात राजू चांदेवार यांचा सिंहाचा वाटा आहे.

Share