देवरी येथील भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी 1 आला पॉझिटिव्ह
डॉ. सुजित टेटे
देवरी 28: राज्यात वाढत्या कोरोनाचे प्रमाण बघता कोरोना नियंत्रनात आणण्यासाठी ब्रेक द चैन या मोहिमे अंतर्गत देवरी येथील तालुका प्रशासन सज्ज झाले असून देवरी येथील सब्जी मंडी मध्ये 31 भाजी विक्रेत्यांची कोरोना टेस्टिंग करण्यात आले असून त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांची रवानगी देवरी च्या कोविड केंद्रात करण्यात आली आहे.
सदर मोहीम राबवितांना देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ललित कुकडे , आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी , नगरपंचायत कर्मचारी आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते .