आयसीएसई बोर्डाची दहावीच्या परीक्षा रद्द

प्रहार टाईम्स
वृत्तसंस्था / नवी दिल्ली 20:
देशात करोनाचा कहर वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात न घालण्याच्या दृष्टीने अनेक परीक्षा रद्द करण्यात येत आहे. सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयसीएसई (ICSE) बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे. याआधी बोर्डाकडून दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आयसीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यास सांगण्यात आले आहे.
शाळांना अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन क्लासेसाठी टाइमटेबल आखण्यासही सांगण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share