देवरी येथे दरोडा , वृध महिला गंभीर

प्रहार टाईम्स

देवरी १३: देवरी येथे कारगिल चौक साई मंदिर लगत ट्विंकल भाटिया यांच्या घरी सायं ७:३० च्या सुमारास दरोडा पडला असुन सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घरी वृध महिला एकटी होती. एकटीला बघुन डोकयावर जबर वार करुण मोठी दुखापत झाली असून उपचारासाठी गोंदिया ला हलविले असल्याचे माहिती प्राप्त झाली.

सदर घटने मधे मोठी रक्कम लंपास झाल्याचे बोलले जात असुन घटनास्थळी अतुल कुलकर्णी अप्पर पोलिस अधीक्षक देवरी यांनी भेट दिली असुन पोलिस निरीक्षक अजित कदम आणि देवरी पोलिस घटनेचा तपास करित आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share