करूणा अनिल कुर्वे यांची शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका पदावर नियुक्ती


देवरी 11- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे आदेशाने, शिवसेना नेते पूर्व विदर्भ संपर्क नेते खासदार श्री गजानन किर्तीकर, पूर्व विदर्भ शिवसेना समन्वयक श्री प्रकाश वाघ यांचे सूचनेवरून शिवसेना गोंदिया व भंडारा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख निलेश धुमाळ यांचेशी चर्चा करून शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांचे द्वारा सौ. करूणा अनिल कुर्वे यांची शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिकाच्या पदावर सर्वसम्मतीने नियुक्ती करण्यात आली असून अर्जूनी मोरगाव व आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे महिला संघटन वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली. सौ. करूणा अनिल कुर्वे यांच्या नियुक्तीमुळे गोंदिया जिल्ह्यातील शिवसेना महिला संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जात असून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.


गोंदिया जिल्हा संघटिका पदावर माझी नियुक्ती करून पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही व गोंदिया जिल्ह्यातील शिवसेना महिला संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन असे मत नवनियुक्त जिल्हा संघटिका करूणा अनिल कुर्वे यांनी व्यक्त केले.


सौ. करूणा अनिल कुर्वे यांची शिवसेना जिल्हा संघटिका पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे शिवसेना गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख कगेश राव, देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा, जिल्हा उप संघटिका माया शिवनकर, आमगाव तालुका महिला संघटिका देवांगना तुरकर, महिला शहर संघटिका मारबदेताई, देवरी तालुका शिवसेना महिला संघटिका प्रिती उईके, आमगाव विधानसभा संघटक राजिक खान, शिक्षक सेना देवरी तालुका अध्यक्ष अनिल कुर्वे, शिक्षक सेना शहर अध्यक्ष सुभाष दुबे इत्यादी शिवसेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share