देवरी : तालुका देवरीतील शेडेपार /बिलारगोंदी येथे वर्ष ११ वे शिवमहापुराण ज्ञानयज्ञ कथा सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम दि. २७ डिसेंबर २०२५ (शनिवार) ते ०२ जानेवारी २०२६ (शुक्रवार) या कालावधीत समाज मंदिर, शेडघार येथे संपन्न होणार आहे. या पावन शिवकथेसाठी ह.भ.प. कल्याणीताई खेडकर (श्री सद्गुरु कल्याणस्वामी संस्थान, कळवली, जि. बिड) या कथा प्रवक्त्या म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या अमृतवाणीतील शिवमहापुराण कथांचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
सदर ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून भगवान महादेवांच्या लीला, शिवतत्त्व, भक्ती, वैराग्य व जीवनमूल्यांचे सुंदर विवेचन करण्यात येणार आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून कथा श्रवण करणार असल्याने परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दि. २७ डिसेंबर २०२५ (शनिवार) रोजी दुपारी १२ वाजता भव्य कलश यात्रा, सायंकाळी ४ वाजता दीपप्रज्वलन उद्घाटन सोहळा, सायंकाळी ५ ते ७ वाजता हरिपाठ व रात्री ७ ते १० वाजता प्रवचन अशा कार्यक्रमांनी होणार आहे.
दि. २८ डिसेंबर २०२५ ते ०१ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ५ ते ७ वाजता हरिपाठ व रात्री ७ ते १० वाजता प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
समारोपाच्या दिवशी दि. ०२ जानेवारी २०२६ (शुक्रवार) रोजी सकाळी १० ते १२ वाजता प्रवचन, दुपारी १ वाजता ग्रंथपूजन, दुपारी २ वाजल्यापासून गोपालकाला व महाप्रसाद तसेच रात्री ८ वाजता बिद्याचा कार्यक्रम होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमासाठी आमदार संजय पुराम यांच्या सह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सर्व भाविकांनी या पावन धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.









