‘शैक्षणिक संस्था आणि नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन’ विषयावर चंद्रपूर वन प्रबोधन प्रबोधिनीचा उपक्रम

उपसंचालक हनुमंत जाधव यांचे प्रभावी मार्गदर्शन

देवरी: ब्लॉसम पब्लिक स्कूल, देवरी येथे चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या वतीने आयोजित “Educational Institutes and Natural Resource Management” या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून हनुमंत जाधव, उप संचालक (प्रशिक्षण) यांनी विशेष उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी शाहिद खान मानद वन्यजीव संरक्षण, सविता गिरी, प्राचार्य डॉ. सुजित एच टेटे उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान श्री. जाधव यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, वन व वन्यजीव संरक्षण, पर्यावरणीय संतुलन याबाबत सखोल माहिती दिली. शैक्षणिक संस्थांची भूमिका, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि भविष्यकालीन संवर्धन उपक्रमांबाबत त्यांनी विचारमंथन केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रश्न विचारत सक्रिय सहभाग नोंदविला.

चंद्रपूर वन प्रबोधिनीमार्फत दर महिन्याला प्रकाशित होणारे ‘Wild Chandrama’ हे मासिक शाळेच्या वाचनालयासाठी प्रदान करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पर्यावरण संवर्धनाबाबतच्या जाणिवांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित एच टेटे, नितेश लाडे , वैशाली मोहुर्ले, राहुल मोहुर्ले , आरती चौधरी व विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें