आधारसाठी आता आकारले जाणार 125 रुपये

गोंदिया : भारतीय विशिष्ट ओळखप्राधिकरण आधार नोंदणी व आधार अपडेट, तसेच अनिवार्य आधार अपडेट सेवांसाठी सुधारीत दर निश्चित करण्यात आलेले आहेत. निश्चित केलेल्या दराच्या व्यतिरिक्त आकारल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे निर्देशित करण्यात आले आहे. पुढील तीन वर्षासाठी दर बदलण्यात आलेले असून हा कालावधी १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर २०२८ असा आहे. आधार नोंदणी कामासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने हे नवे दर जाहीर केले आहेत.

नागरिकांनी प्रत्यक्ष आधार चा वापर न करता मास्क आधार स्र्टी चा वापर करावा जेणेकरून आधारचा गैरवापर होणार नाही. तसेच ठरविलेल्या दराप्रमाणे नागरिकांनी आधार अपडेशन करीता जास्तीची आकारणी करणाऱ्या केंद्र चालकाविरुद्ध तक्रार संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालय (माहिती तंत्रज्ञान विभाग) येथे करावी, यासह याकामी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण प्रादेशिक कार्यालय मुंबई यांचे टोल फ्री क्रमांक-१९४७ वर तक्रार नोंदविण्यात यावी. ई-मेल आयडी help@uidal.gov.in यावर सुद्धा तक्रार करता येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आधार प्रकल्प भैय्यासाहेब बेहरे यांनी कळविले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें