अबेकस च्या राष्ट्रीयस्तर स्पर्धेत श्रुती मरकाम तृतीय

डॉ. सुजित टेटे

देवरी ९: युसीमास द्वारा आयोजित राष्ट्रीय अबेकस स्पर्धे मध्ये देवरीच्या आर्यशी अबेकस सेंटर मध्ये शिकत असलेली श्रुती लक्ष्मीशंकर मरकाम हिने तृतीय क्रमांक पटकावून तालुक्यात मानाचा तुरा रोवला.

सविस्तर वृत्त असे की युसीमास अबेकस द्वारा 23 जाने ते 26 जाने. दरम्यान राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये श्रुती मरकाम हिने देवरीचे प्रतिनिधित्व केले असून त्याचा निकाल आज घोषित करण्यात आला असून त्यामध्ये तिने प्राविण्य मिळविले आहे .

सदर यशाचे श्रेय प्रशिक्षिका प्रगती मुनेश्वर आणि आई वडिलांना दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share